Views
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा तालुका शिवसेनेतर्फे मौजे आवार पिंपरी ता.परंडा येथे महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आला.

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव साहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्तशिवसेना तालुका प्रमुख श्री आण्णासाहेब जाधव यांचे प्रमुख  उपस्थितित परंडा तालुका शिवसेनेतर्फे मौजे आवार पिंपरी ता परंडा येथे महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आला.
त्यावेळी  मा उद्धवसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, तसेच सध्या जगावर कोरोनाचे असलेले महासंकट लवकरच दूर व्हावे, बळीराजा सतत सुखात असावा अशी श्रावण सोमवार च्या शुभ मुहूर्तावर प्रार्थना करण्यात आली.
यावेळी प्रा तानाजी सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रामचंद्र घोगरे, शिवसेना  उपतालुकाप्रमुख श्री बळी गवारे, शुक्राचार्य ढोरे, परंडा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, शाम मोरे,  राजेंद्र  पाटील, अशोक गरड, भारत ढोरे, शिवाजी व्होरे, राजाभाऊ शिंदे, विनोद जगताप, अमोल जगताप, सागर बुरंगे यांचे सह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते,

 
Top