Views


कोरोनाच्या संकटकाळात भारतीय ग्रामीण संस्था व कोरो इंडिया यांच्या वतीने सामाजिक भावना जपत लोहारा शहरात व तालुक्यात किराणा साहित्य वाटप 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
कोरोनाच्या संकटकाळात गरीब होतकरू महिला मजूर वर्गाच्या हाताला कामे नसल्याने तसेच विधवा परितक्त्यातील गरजू महिलांना कोरो इंडिया मुंबई व भारतीय ग्रामीण विकास संस्था लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भावना जपत लोहारा शहरासह तालुक्यातील आरणी, कानेगाव, भातागळी, कास्ती, नागुर, मार्डी, बेंडकाळ, लोहारा खुर्द, खेड, माळेगाव, पांढरी, मोघा, नागराळ, हिप्परगा, वडगांव वाडी, आदी गावात किराणा साहित्य गेल्या आठ दिवसापासून वाटप केले जात आहे. यामध्ये बिस्कीट, शेंगदाणे, चहापत्ती, साखर, डाळ, पोहे, तांदूळ, साबण, गोडेतेल, मीठ, गव्हाचे पीठ असे गरजवंतांना वाटप करण्यात आले. व तसेच लोहारा शहरातील भारतीय ग्रामीण विकास संस्था कार्यालयात एकल महिला विधवा परितक्त्यातील कार्यकर्त्यासह गरजू निराधार महिलांना दि.27 जुलै रोजी सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करीत गरजू महिलांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कोरो इंडियाचे मराठवाडा प्रतिनिधी राम भाऊ शेळके, मराठवाडा विभाग कार्यकर्ती लक्ष्मी ताई वाघमारे, ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष भास्कर माने, कमलाकर सिरसाट, सहेली ज्योतीताई बिराजदार, शांताताई संगशेट्टी, जयश्री वाघमारे, प्रगती माने, पंचशीला कांबळे, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
 
Top