Views


लोहारा तहसील कार्यालयात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न – आ. चौगुले यांनी केली कोविड केअर सेंटरची पाहणी

लोहारा :-(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांच्या जागरुकतेमुळे प्रशासनास मदत झाली व प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यातील योग्य समन्वयामुळे तालुक्यातील सद्यस्थितीपर्यन्त कोरोना आटोक्यात राहिली आहे, असे मत आ. ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केले. लोहारा तालुक्यातील विविध समस्या संदर्भात आ.ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली दि.15 जुलै रोजी लोहारा तहसिल कार्यालयात आढावा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार विजय अवधाने, गटविकास अधिकारी प्र. अशोक काळे, लोहारा नगर पंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, नायब तहसिलदार रणजित शिराळकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक आर. यु. सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शिवसेना गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक शाम नारायणकर, अबुलवफा कादरी, नगरसेवक गगन माळवदकर, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख श्रीकांत भरारे, आदी, उपस्थित होते. या बैठकीत कोरोना आजरापासून दक्ष राहण्यासाठी सर्व ग्रामपंचायत व धार्मिक स्थळे याठिकाणी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणेबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच विलगीकरण करण्यासाठी शिक्षण विभागाकडे परत देण्यात आलेल्या शाळा गरज पडल्यास आवश्यक त्या ठिकाणी प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व ठिकाणचे पर्जन्यमान, दुबार पेरणीचे संकट, बियाणे न उगवलेल्या तक्रारी, अन्नसुरक्षा योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आमदार ज्ञानराज चौगुले व वरिष्ठ अधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, या ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन त्याठिकाणी असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.

 
Top