Views


कोरोणाच्या काळात 'सह्याद्री' मुळे गर्भवती महिलांच्या कुटुंबीयांची आर्थिक बचत झाली -- ढोकी उपसरपंच अमोल समुद्रे

लोहारा :-(इक्बाल मुल्ला)

 ढोकी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स उस्मानाबाद तर्फे गरोदर मातांची सिझेरियन शस्त्रक्रिया व सामान्य प्रसूती ही विनामूल्य केली जात आहे. याची सविस्तर माहिती देण्यासाठी डॉ. दापके - देशमुख दिग्गज यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त गर्भवती महिलांच्या कुटुंबापर्यंत ही  माहिती देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आभार व्यक्त करताना उपसरपंच अमोल समुद्रे यांनी 'सह्याद्री' ने या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपली याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच कोरोणाच्या महामारी प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन विशेष काम करत असल्याबद्दल ढोकी पोलीस पाटील राहुल वाकुरे- पाटील सर्व आशाताई यांचा  मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सरपंच नानासाहेब चव्हाण, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दगडू धावारे, ग्रामपंचायत सदस्य बारी साहेब काझी, पोपट शेंडगे, मोमीन कुरेशी, किशोर ढवारे, ग्रामीण विकास अधिकारी पवार साहेब, डॉ बाळासाहेब लोमटे, ह.भ.प. नानासाहेब घाडगे, आशा सुपरवायझर सुरेखा गुंजकर- कदम भारत माता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता गुणवंत सुतार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक अंतर राखत हा कार्यक्रम घेण्यात आला.

 
Top