Views


माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

कळंब:-(प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या जागतिक महामारी कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर वाढदिवस साजरा करण्यासाठी होणारा आवस्तव खर्च टळुन गरजुना मदत करण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे गरजु, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मकरंद पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन तथा भाजपा नेते संजय पाटील, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव गिड्डे पाटील, युवा नेते बलराम कुलकर्णी, सतीश वैद्य, सावता माळी, नितीन बंडगर, अनिल शेळके, श्रीकृष्ण दादा शेळके, ज्ञानु बंडगर, दिलीप चाचा गरजे, उपस्थित होते.

 
Top