माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात मास्क वाटप
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काेराेना सेवाकार्य म्हणून भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक भावना जपत लोहारा शहरात भाजपाच्यावतीने पत्रकार , गरिब वंचित कुटुंबाना, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, भाजी विक्रेते, हातगाडी चालवणारे सफाई करणार्या महिला, व पुरुष कर्मचारी, छाेटे हाॅटेल चालक, बांधकाम मजुर या सर्वाना साेशल डिस्टन्स ठेऊन मास्क वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, वि.का.सोसायटी चेअरमन प्रशांत लांडगे, *विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, बाळु माशाळकर, आदि उपस्थित हाेते.