Views


*रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल कौशल्याचा अध्यापनात वापर हे कृतीसत्र संपन्न.*
कळंब :-(प्रतिनिधी)
       कोरोनामुळे सर्व शिक्षक आज विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकत नाही. ही स्थिती सर्वांसाठीच अनपेक्षित अशी आहे. तरीही  सर्वजण आपापल्या परीने याचा सकारात्मक उपयोग करत आहेत . आपण आपल्यासाठी, आपल्या विद्यार्थी आणि सहकाऱ्यांसाठी या वेळेचा उपयोग अधिकाधिक नाविन्यपूर्ण पद्धतीने करावा, सहजतेने आणि सुलभतेने Online माध्यमातून विद्यार्थी आणि सहकाऱ्यांपर्यंत पोहोचावे यादृष्टी कोनातून  रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 यांच्या संयुक्त विद्यमाने दि १४  ते १८ जुलै २०२० या ५ दिवसांची मोफत डिजिटल कौशल्यांची एक Video Series १५ डिजिटल स्किल्स फॉर स्मार्ट टीचिंग घेऊन संपन्न करण्यात आली. Online पद्धतीने एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचताना आवश्यक असणारी निवडक कौशल्ये Video च्या स्वरुपात देण्यात आली. प्रत्येक कौशल्याचा एक स्वतंत्र Video होता आणि त्यावर आधारित काही प्रश्न होती. दुसऱ्या दिवशी त्या प्रश्नांची उत्तरे देणारा Video, नवीन कौशल्याचा Video आणि त्यावरील प्रश्न ह्या स्वरुपात ही Series  पुढे नेण्यात आली. अगदी सहजतेने आणि अल्प वेळात शिक्षकांना डिजिटली सक्षम करण्याचा रोटरीचा हा उपक्रम. Do it Yourself म्हणजेच तुम्ही स्वतः करून पहा आणि कृतीतूनच शिका या संकल्पनेतून रोटरी ने हा उपक्रम राबवला. रोटरी क्लबमार्फत आम्ही शिक्षकांना हे स्किल्स रोजच्या रोज व्हॉटसअँप ग्रुपमधून पाठवत होतो. सहाव्या दिवशी सराव घेऊन सातव्या दिवशी एक ऑनलाईन टेस्ट घेऊन त्यांना सहभागाचे ई- प्रमाणपत्र ई मेलद्वारे पाठवले गेले.
    रोटरीच्या या शिक्षकांसाठीच्या डिजिटल कौशल्यांचा अध्यापनात वापर या कृतिसत्रात ४३७ शिक्षकांनी सहभाग नोंदवून  उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेसाठी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष डॉ. गिरीष कुलकर्णी, सचिव डॉ.सचिन पवार , प्रोजेक्ट चेअरमन श्री. अरविंद शिंदे, रोटे. संजय घुले, रोटे. सुशीलकुमार तिर्थकर यांनी परिश्रम घेतले.
 
Top