Views


उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यु :- जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे  

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

  कोरोणाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व त्यांच्या कुटुंबाने स्वतःला नियमांमध्ये बांधून घेणे आवश्यक आहे .आपण सर्व जण जाणतो कोरोणा विषाणू  संसर्ग थांबवायचा असेल तर सुरक्षित अंतर पाळणे हे आपल्या सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे. रोजच्या जीवनामध्ये खरोखरच आवश्यक नसेल तरच बाहेर पडा गर्दीमध्ये जाणे आवर्जून टाळा घरामध्ये वृद्ध लहान मुले गरोदर महिला आजारी माणसे यांचेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे आपण सर्वांनी प्रयत्न करणे नियम पाळणे योग्य ती खरी माहिती प्रशासनाला देणे व सहकार्य करणे आवश्यक आहे.
      यासाठी जिल्ह्यामध्ये दर रविवारी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनता कर्फ्यू घोषित करण्यात आलेला आहे सर्व स्तरावरील गरजेची ठिकाणी जसे की बँका, डी मार्ट ,मोठी भुसार मालाचे दुकाने ,कपड्यांची दुकाने, खत बियाण्यांची दुकाने ,शेती अवजारांची दुकाने, हे त्याचे ठिकाणी येणारे व्यक्तीचे थर्मल बॅनर द्वारे तापमान असावे तसेच पल्स मीटरने ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे व त्याचा वापर करून सामाजिक अंतर ठेवून सर्व व्यवहार करावेत सर्व पेट्रोल पंप धारकांना आव्हान करण्यात येते की त्यांनी वाहन धारकांना गरजेनुसार कमीत कमी पेट्रोल वितरित करावे जेणेकरून कोणतेही काम नसताना तरुण मुले व व्यक्ती इतरत्र फिरणार नाही.
     कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे दृष्टीने सोलापूर व मुंबई इ येथून आलेल्या सर्व व्यक्तींना कोरं टाईम केले जाईल याबाबत नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये ग्रामस्तरीय कर्मचारी व स्वयंसेवकाच्या मार्फत आरोग्या बाबत सर्वे करण्यात येत आहे. या व्यक्तींना हायपर टेन्शन, मधुमेह, अस्थमा कर्करोग, हृदयविकार इत्यादी दुर्धर आजार आहेत त्यांनी आपली खरी माहिती स्वयंसेवकांना देवी जेणेकरून भविष्यामध्ये गरज वाटल्यास त्याचेवर योग्य वेळी औषधोपचार करणे सोयीचे होईल सर्व नागरिकांनी त्यांच्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे .असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उस्मानाबाद श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी आव्हान केले.

 
Top