Views
येणेगूरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व आर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्यांचे वाटप              

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
   खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येणेगूर येथे सामाजिक कार्यकर्ते मुजीब मकानदार यांच्याकडून मास्क, आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे व सॅनिटायझरचे गावात वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रुग्ण हक्क परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.खाजालाल ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य महादेव बिराजदार, युवक काँग्रेस कार्यकर्ते समद वरणाळे, अॅड.व्यंकट इटकरी, अशिफ मुल्ला, अरबाज शेख, हुसेन मुल्ला, अरबाज मकानदार, मुस्त्किन भालके, लखन भोरे आदिंच्या उपस्थितीत पोलिस ठाणे व गावातील विविध भागात जाऊन वाटप करण्यात आले.

 
Top