Views


विनाअनुदानीत शाळा शिक्षकांचे अनुदानासाठी घरीच अमरण उपोषन!


कळंब:-(प्रतिनीधी)
 तालुक्यातील मौजे जायफळ येथील प्रा. भाऊसाहेब खिचडे यांनी महाराष्ट्रातील विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांना अनुदान मिळावे म्हणून दि.२३ जुलै पासून  घरीच अमरन उपोषणास सुरूवात केली असून, उपोषणाचा आज तिसरा दिवस उलटला आहे.
       या बाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील अनुदान पात्र उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना दि.१ एप्रिल २०१९ पासून पगार देण्यात यावा, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यादी व दि. १ एप्रिल पासून २०१९ पासून प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्यात यावे, बिंदू नामावलीची टाकलेली अट रद्द करावी . असे निवेदनावर नमूद केले आहे. सदरील उपोषणा बाबतची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजीत पवार, शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड, उस्मानाबाद  जिल्हाधिकारी डॉ.दीपा मुधोळ -मुंडे, विभागीय उपसंचालक शिक्षण लातूर आणि शिक्षणाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांना निवेदनाव्दारे कळवले.

 
Top