Views


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर पालिकेने नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे - ओमप्रकाश शेटे 


कळंब (प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर पालिकेने नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी केले.
नगर पालिका ओमप्रकाश शेटे यांनी भेट दिली असुन यावेळी नगर पालिकेने कोरोना बाबत काय उपाययोजना केली आहे. याची माहिती घेतली. 
  सध्या कोरोनामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी व पुढे येऊन नागरीकांच्या मनातील भिती काढण्याचा प्रयत्न करावा. कोरोना बाबत प्रभाग निहाय काय उपाययोजना करता येतील याचा आराखडा तयार करुन तात्काळ उपाययोजनेला प्रारंभ करावा, नगरसेविका आपला प्रभाग कसा सुरक्षित राहील याकडे लक्ष द्यावे, नागरिकांना आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याचे अवाहन करावे, सोशल डिस्टन्स पाळावा, घरोघरी जाऊन जनजागृती करावी यासह विविध सुचना यावेळी दिल्या. 
प्रथमच ओमप्रकाश शेटे हे नगर पालिका येथे आल्यामुळे नगराध्यक्षा सुवर्णा सागर मुंडे, माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, उपनगराध्यक्षा साधना बागरेचा, माजी उपनगराध्यक्षा इंदुमती हौसलमल, गिता पुरी,नगरसेवक लक्ष्मण कापसे, अमर गायकवाड मुख्याधिकारी देविदास जाधव, सागर मुंडे, शकील काझी, महेश पुरी यांनी सत्कार केला.
 
Top