Views


महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट(सामाजीक सघंटना) महा.राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.नदिम मुजावर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा 

भूम:-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट ( सामाजिक सघंटना) महा.राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.नदिम भाई मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
 यावेळी संपुर्ण महाराष्ट्रात विविध ठीकाणी वाढदिवस साजरा करुन गरजु लोकांना मदत करण्यात आली. मंगळवार (दि.07) सकाळी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत रामटेकडी येथे गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले
सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत तय्यबीय    अनाथ आश्रम, फॅशन स्ट्रीट पुणे येथील लहान मुलांना खाऊ वाटप व त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आले.
    तसेच दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत विरवानी प्लाझा मध्यवर्ती कार्यालय येथे कोर कमिटी सदस्य व पदक प्रमुख पदाधिकाऱ्यांना जेवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत हजरत मुंडेशाहवली  (रहमतुल्ला अलैह ) खडकी येथे मदरसा मध्ये शिकणाऱ्या मुलांना गरजू वस्तूंचे वाटप मा. नदीमा भाई मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. 
         तसेच संध्याकाळी 4:30 ते 7:30  वाजेपर्यंत कार्यकर्ते व मित्र मंडळ मंडळी यांना भेटण्यासाठी पुणे येथील मध्यवर्ती कार्यालय येथे नदीम भाई मुजावर उपस्थित राहुन शुभेच्छा घेतल्या . व तसेच आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष  व राजु पठाण भोनगिरी यांच्या वतीने भोनगिरी येथे मास्क वाटप फळ वाटप करण्यात आले .
      यावेळी शाहाबुद्दीन एम शेख प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट लतीफ सय्यद नाहेद मुजावर उपस्थित होते.

 
Top