Views


जीवन हे संघर्षमय असून समाजात वावरत असताना मानसे वाचायला शिका आपल्याला भेटलेल्या माणसातील अवगुणाकडे दुर्लक्ष करीत  सकारात्मक दृष्टिकोन ठेवा  आपले व समाज जीवन समृद्ध बनवा - निवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव माळी 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 जीवन हे संघर्षमय असून समाजात वावरत असताना मानसे वाचायला शिका आपल्याला भेटलेल्या माणसातील अवगुणाकडे दुर्लक्ष करीत  सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांच्यातील समाज उपयोगी गुण आत्मसात करीत आपले व समाज जीवन समृद्ध बनवा असे प्रतिपादन निवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव माळी यांनी जेवळी येेथे केले.
  लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रहिवासी असलेले निवृत्त शिक्षण अधिकारी बाबुराव माळी यांनी लिहिलेल्या 'तेथे कर माझे जुळती' या सातव्या पुस्तकाचे प्रकाशन येथील बसवेश्वर मंदिरातील संस्कृती सभागृह ह.भ.प. शरणाप्पा कोरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर झालेले या छोटेखानी प्रकाशन सोहळ्यात निवृत्त शिक्षणाधिकारी, लेखक बाबुराव माळी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी या पुस्तकाच्या देणगीमूल्यद्वारे जमा झालेली रक्कम ही हायस्कूल लोहाराच्या माजी विद्यार्थी व शिक्षकांनी स्थापन केलेल्या विद्या विकास प्रतिष्ठान या संस्थेमार्फत परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरता येणार आहे, असे जाहीर केले. लेखक माळी हे शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी, सहाय्यक आयुक्त या पदा बरोबरच शिक्षणासंबंधी विविध पदावर काम केले आहे. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर लेखनाकडे वळले गेला पाच वर्षात आत्तापर्यंत मायेची माणसं, उध्व्दवस्त गावची गौरवशाली गाथा, माझी शाळा माझे विद्यार्थी, निर्मळ मनाची प्रेमळ माणसं, सोबती, अजब तुझे सरकार, तेथे कर माझे जुळती असे सात पुस्तके प्रकाशित झाले आहेत. आत्ता 'तेथेे कर माझे जुळती' या पुस्तकात त्यांना भेटलेल्या, भावलेल्या सात व्यक्तीच्या संघर्षमय जीवन उलगडून दाखवले आहे. या कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार गुरलिंगप्पा कानडे, संचालक व्ही.आय. कोरे, मुख्याध्यापक डी.व्ही.खडके, माजी मुख्याध्यापक बी.एल. कोरे, तुळशीदास मक्तेदार, एस.आर.कोरे, किसन पतंगे, काशिनाथ कटारे, बाळासाहेब देशपांडे, सुरेश माळी, प्रा बसवराज म्हेत्रे, आर.व्ही.पाटील, संदीप ढोबळे, सुरेखा चेंडके, सुषमा बाराजदार आदीं, उपस्थित होते.
 
Top