Views


छत्रपती मल्टिस्टेट मधील कर्मचारी सतीश गवळी यांनी बँकेत पडलेली सोन्याची पाच ग्राम  अंगटी बँकेचे ग्राहक बाळासाहेब गुंजाळ यांना वापस करून माणुसकी  जोपासली 

भुम:-( प्रतिनिधी)

       येथील छत्रपती मल्टिस्टेट मधील कर्मचारी सतीश गवळी यांनी बँकेत पडलेली सोन्याची पाच ग्राम  अंगटी बँकेचे ग्राहक बाळासाहेब गुंजाळ यांना वापस करून माणुसकी चे सुरेख उदाहरण जोपासले आहे.
बाळासाहेब गुंजाळ यांच्या किडन्या निकामी असल्याने त्यांना प्रत्येक चार ते पाच दिवसाला डायलिसीस साठी गाडी भाड्याने करून उस्मानाबाद येथे जावे लागत आहे. कारण लॉक डाऊन झाल्या पासून उस्मानाबाद येथे जाण्यासाठी प्रवासी मिळत नसल्याने एस.टी बंद करण्यात आल्या आहेत. 
         यामुळे गुंजाळ यांना डायलिसिस ला जाण्यासाठी  गाडी किराया ने घेऊन जावे लागत आहे . उत्पनाचे साधन नसल्याने व खर्च वाढत चाल्याने गुंजाळ यांनी छत्रपती मल्टिस्टेट येथे सोने तारण कर्ज घेतले होते व पुढील उपचार सुरू ठेवले.दरम्यान खर्च वाढत असल्याने ना इलाजस्तव एक एकर शेती विकली व झालेले देणे पाणी देऊन बँकेतील सोने सोडवले. 
      या सोडवून घेतलेल्या सोन्यामधील नकळत गुंजाळ यांच्या कडून सोन्याची अंगटी बँकेत पडली ही अंगटी बँकेचे कर्मचारी सतीश गवळी यांना दिसताच अंगटी शाखा प्रमुख संतोष वीर यांना दिली वीर यांनी ग्राहक गुंजाळ यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली व शाखेत बोलावून त्यांना अंगटी वापस केली असता गुंजाळ यांनी वीर व गवळी यांचे मनापासून आभार मानले.
 
Top