Views


कोरोनाच्या संकटात आशाताईंचे कार्य उल्लेखनीय -- डॉ.दापके -- देशमुख दिग्गज


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
कोरोनाच्या संकटात आशाताईंचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन सह्याद्री फाऊंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष
 डॉ.दापके -- देशमुख दिग्गज यांनी केले. कोरोनाच्या संकटात गरोदर मातांना आर्थिक आधार देण्यासाठी उस्मानाबाद येथील सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स मध्ये सिझेरियन प्रसुती शस्त्रक्रिया व नॉर्मल प्रसूती स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. वसुधा दापके - देशमुख यांनी विनामूल्य ठेवली आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी दारफळ ता. जि. उस्मानाबाद येथील गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे आशा कार्यकर्ते व पोलीस पाटील यांना सह्याद्री फाऊंडेशन्स व दारफळ ग्रामपंचायतीच्या वतीने 'सन्मानपत्र' देऊन गौरविण्यात आले. सामाजिक अंतर ठेवून व शासकीय  नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आशाताई, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ व बचत गटांना डॉ. दापके - देशमुख मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब घूटे यांनी केले तर आभार हेमंत सुरू यांनी मानले. यावेळी सरपंच बालिका सुतार, उपसरपंच धर्मराज जाधव, पोलीस पाटील सचिन जाधव, चव्हाण सर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र इंगळे, वंदना गुप्ते, अमोल जाधव, अमितकुमार सुतार, मोहर घुटे, हनुमंत कदम, मैना भुतेकर, सुनिता भोईटे, मंगल सुतार, सारिका जाधव, कापसे मॅडम, आदि, मान्यवर उपस्थित होते.
 
Top