कोरोनाला निमंत्रण देण्यापेक्षा लॉक डाऊन काळात घरिच राहून भविष्यात आयूष्यभर आनंद घ्यावा असे आवाहन- सामाजिक कार्यकर्त्या सौ आश्विनी महेश गुळवे
भुम : -(आसिफ जमादार)
प्रत्येक वर्षीचा नागपंचमीचा सण म्हणजे महिलांच्या आनंदाला उधाण येणारा काळ समजला जातो . यावर्षी आनंदावर विरजण पडले आहे . घरातल्या झुल्यावर समाधान मानायची वेळ भगिनींवर आली आहे . सणाच्या दिवसाच्या आनंदापायी गावी येवून कोरोनाला निमंत्रण देण्यापेक्षा लॉक डाऊन काळात घरिच राहून भविष्यात आयूष्यभर आनंद घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ आश्विनी महेश गुळवे यांनी केले आहे .
प्रत्येक वर्षी नागपंचमी सणानिमित गावोगावी अनेकविध समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जातात . विशेष करुन हा सण श्रावण महिन्यात येतो . या महिन्यात सतत वेगवेगळे कार्यक्रम असतात
या सनानिमित्ताने नवीन लग्न झालेल्या नववधू हमखास माहेरी येतात . मैत्रिणी समवेत आनंद लुटतात . शहरात मोठया ईमारत उभारणीमुळे किवा शहरातर्गत विकास कामाच्या अनूषंगाने मोठया प्रमाणात वृक्षतोड केली जातो . शहराच्या रस्त्यावर असलेल्या मोठया झाडाना झोका बांधला तरि सततच्या वाहनाच्या र्वदळीमुळे झोका खेळण्याचा आनंद घेता येत नाही .
या तुलनेत ग्रामीण भागात गावाच्या सभोवताली मोठमोठी झाडे वाढलेली असतात . एक एका झाडाला दोन तीन झोके बांधली जातात . महिलासह मुलींची बरोबरच यूवकांचीही झोका खेळण्यासाठी मोठी गर्दि होते . सायकाळी उशिरापर्यत महिलांचा फेर धरुन धार्मिक गीतगायनाचा उपक्रम चालू असतो .
यावर्षी मात्र महिलांच्या सर्वच कार्यक्रमावर कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे बंधन आले आहे .कोरोनाला रोखण्यासाठी गावोगावी प्रशासनाची करडी नजर आहे . बेकायदेशीर गर्दीचे कार्यकम घेणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे .
गेले चार महिन्यापासून जगाचीच आर्थीक नाडी विस्कटली आहे . विस्कटलेली घडि पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाची सातत्याने धावपळ चालूच आहे . वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत . केवळ कोरोनाचा नायनाट करण्यासाठी गर्दिच्या कार्यक्रमावर बंधन आल्यानेच यावर्षीच्या नागपंचमी सणावर त्या निमित्ताने घेता येणाऱ्या कार्यकृमाचा हिरमोड झाला आहे .
सनाचा आनंद घेण्यासाठी म्हणून केवळ औनलाईन पास काढून गावी कोणी येण्याचा प्रयत्न केला जात असेल तो क्षणिक आनंद उपयोगाचा नाही . एक दिवसाच्या आनंदापायी कोरोनाला जवळ करण्यापेक्षा काहि दिवस लॉक डाऊनमध्ये घरि राहून नंतर आयूष्यभर आनंद घ्यावा असेही आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ आश्विनी महेश गुळवे यांनी केले आहे .