रिपब्लिकन सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या कार्यालया समोर काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले.
कळंब:-(प्रतिनिधी)
राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई दादर येथील निवासस्थान राजगृहावर बुधवार दि.(07) रोजी अज्ञात दहशतवादी हल्लेखोरांनी हल्ला केला. त्याठिकाणी हल्लेखोरांनी बेशुमार दगडफेक करून देशातील अत्यंत ऐतिहासिक वास्तूचे नुकसान केले आहे .डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर करण्यात आलेली दगडफेक हि अत्यंत निषेधार्थ व घृणास्पद बाब आहे .राज्यसरकारने तात्काळ राजगृहावरील हल्ल्याच्या संबंधित असलेल्या दहशतवादी लोकांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याशिवाय राजगृहाला व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटूंबातील सर्व सदस्यांना राष्ट्रीय दर्जाची झेड सुरक्षा प्रदान करण्यात यावी या हल्ल्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीने गुरुवार(दि.09) रोजी कळंब उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या कार्यालया समोर काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले. सरकारने या निवेदनावर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र यांना देण्यात आले निवेदनावर रिपब्लिकन सेना अनिल हजारे, रिपब्लिकन सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष चेतनजी शिंदे संपादक दै लोकप्रबोधन लाखन गायकवाड तालुका प्रमुख कळंब भगवानराव ओव्हाळ उपसभापती अॅड आबासाहेब पायाळ सुरज वाघमारे विशाल वाघमारे भैय्या धावारे अप्पासाहेब हजारे अजय माने सनी गायकवाड अक्षय लोंढे आदमाने, शरद गायकवाड ,तात्या माने ,राम माने ,हूजेत बागवान ,सिध्दार्थ हजारे, आदी उपस्थित होते