डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची तोडफोड या प्रकरणाची एस.आय.टी.मार्फत चौकशी करण्याची मागणी
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची तोडफोड या प्रकरणाची एस.आय.टी.मार्फत चौकशी करण्याची मागणी उस्मानाबाद येथील आंबेडकर प्रेमींची जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा.मुख्यमंञी यांचेकडे निवेदनाद्वारे केली मागणी मुंबई, दादर येथील, राजग्रह हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर मोठ्या कस्टाने व बँकेकडेन कर्ज घेऊन बांधले होते. राजग्रह हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील आंबेडकरी अनुयायाचे ते एक प्रेरणा स्थळच आहे.भारतातीलच नव्हे तर जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतके महत्वाचे हे स्थान आहे. आंबेडकरी अनुयायांची ती अस्मिताच आहे. महत्त्वाचे ठिकाण आहे. आहे.अशा राजगृहावर काल संध्याकाळी दोन अज्ञात हल्लेखोर व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील, सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली तसेच घरांच्या काचांवर ही दगडफेक करण्यात आली .यात घरातील कुंड्यांचे, खिडक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना ताबडतोब अटक करून कठोर शासन करण्यात यावे. अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकरी प्रेमींनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे वतीने मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांचेकडे करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, १)राजग्रहाची तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांना विनाविलंब अटक करावी.
२)या प्रकरणाची एस.आय.टी.मार्फत चौकशी करण्यात यावी
३)आंबेडकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे
या प्रमुख मागण्याचे निवेदन आज दि.8 जुलै 2020 रोजी, उस्मानाबाद प्र निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे देण्यात आले आहे. यावेळी हरिभाऊ बनसोडे (से.नि.विस्तार अधिकारी), भालचंद्र कठारे (री.पा.ई. तालुका अध्यक्ष उस्मानाबाद), मा.पृथ्वीराजजी चिलवंत (नगरसेवक न.प.उस्मानाबाद), प्रा.राजा जगताप, आदी उपस्थित होते.