Views


बकरी ईद निमित्त ईदगाह वर नमाज पठण करण्यासाठी व ईद निमित्त  बकरी बाजार भरवण्यासाठी सवलत मिळावी या मागणीचे निवेदन  ए आय एम आय एम उस्मानाबाद च्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आले.

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

शासनाने दिलेली आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ व तसेच महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियम २०१७ अन्वय प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०१/०८/२०२० ते ०३/०८/२०२० पर्यंत संपूर्ण जगभरात मुस्लिम समुदायाचा धार्मिक मोठा सण (ईदुल अजहा) बकरी ईद आहे या वेळेस सर्व मुस्लिम समुदाय धर्मशास्त्राप्रमाणे ईद साजरी करून बकरा उंट व इतर जनावरांची कुर्बानी करतात परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील लॉक डाऊन सुरु असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक सणांमध्ये व्यत्यय येत आहे व सन साजरा करण्यासाठी समाजाला  अडीअडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे मुस्लिम समाजा च्या  धार्मिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या जात  आहेत तसेच मागील रमजान ईदला सुद्धा मुस्लिम समुदायाने घरातच राहून ईद साजरी केली होती प्रशासनाला सहकार्य केले होते परंतु या ईद मध्ये प्रतीकात्मक रीत्या ईद साजरी करता येत नाही त्यामुळे काही अटी व शर्ती घालून संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात सोशल डिस्टंसिंग चे पालन करून शासनाने दिलेल्या नियमानुसार ईदगाह मध्ये नमाज पठण करण्यासाठी परवानगी बहाल करण्यात यावी व तसेच पोलीस प्रशासनास सुद्धा सहकार्य करण्यासंबंधी आदेशित करावे असा उल्लेख   ए आय एम आय  एम  पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आलेल्या   निवेदनात केलेला आहे निवेदन देत असताना एमआयएमचे,शहराध्यक्ष अजहर सय्यद, जिल्हा प्रवक्ता शहबाज काझी, युवा शहराध्यक्ष अल्फैज शेख, समाज सेवक आसेम काजी, सीनियर लीडर मुस्तफाखान,माजी शहराध्यक्ष मोसिन शेख, आरेफ नाईकवाडी, खावेर शेख, व इतर एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top