Views


कळंब  शहरात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई तब्बल 19 हजार रुपये दंड वसूल

 कळंब:-(प्रतिनिधी)
शहरात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कळंब शहरांमधील ज्या नागरिकांनी तोंडाला मास्क बांधले नाही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नागरिक त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
  कळंब शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे मास्कचा वापर न करण्याचे  नियम न पाळणे अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करत तब्बल 19 हजार दंड कळंब न.प पथकाकडून वसूल करण्यात आला या पथकात दिपक खारकर, कार्यालय अधीक्षक एल एस वाघमारे, कर निरीक्षक हिंदुराव जगताप, लेखापरीक्षक कौस्तुभ पवार, विद्युत अभियंता एस पठाण, सलामत पठाण, महेश मुंडे, संतोष खंडागळे, यांनी सदरील कारवाई केली.

 
Top