Views

रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या वतीने पत्रकारांना कोरोणा योध्दा सन्मान प्रमाणपत्र  देऊन व आरोग्य तपासणी शिबिर घेऊन गौरविण्यात आले 

कळंब:-(प्रतिनिधी)
    रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या वतीने रविवार (दि.19) रोजी कळंब तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान समारंभ डॉ.रमेश जाधवर यांच्या ओम बालरुग्णायात घेण्यात आला.या वेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ.गिरीष कुलकर्णी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सुयोग काकाणी, सचिव डॉ.सचिन पवार,कळंब पत्रकार संघाचे विश्वस्त सतिश (बप्पा) टोणगे, कळंब पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर, विलास मुळीक व्यासपीठावर उपस्थित होते.
           रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या वतीने पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर, जेष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, विलास मुळीक, पत्रकार दिलीप गंभीरे,परवेज मुल्ला, मंगेश यादव,जय महाराष्ट्र न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर पंतगे, अमर चोंदे, शिवप्रसाद बियाणी, बालाजी सुरवसे, Live महाराष्ट्र News चे मुख्य संपादक समीर मुल्ला, रमेश अंबिरकर ,खादीम सय्यद,आकिब पटेल, ज्योती सपाटे आदी पत्रकारांना कोरोणा योध्दा सन्मान प्रमाणपत्र  व मास्क तसेच आरोग्य हेल्थ किट चे वरील मान्यवरांच्या हस्ते देऊन तालुक्यातील पत्रकारांचे  आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर व जेष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन प्रा. संजय घुले यांनी केले तर शेवटी सर्वाचे आभार रोटरीयन डॉ.रमेश जाधवर यांनी मानले
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीयन डॉ.रूपेश कवडे, डॉ. रमेश जाधवर, डॉ.अभिजित जाधवर,डॉ.सुनिल पवार, श्रीकांत कळंबकर, सुनिल तिर्थकर, डॉ. निखिल चोपणे,विक्रम गायकवाड, डॉ. हनुमंत चौधरी, मुन्ना कस्तुरकर, विश्वजित ठोंबरे, शिरीष राजमाने, डॉ.अमित पाटील, आदी ने परिश्रम घेतले.


 
Top