Views


सह्याद्री' च्या उपक्रमास उपळा (मा.) ग्रामपंचायतीने प्रतिसाद द्यावा -- डॉ. दापके- देशमुख दिग्गज


लोहारा:-(इकबाल मुल्ला)

 कोरोना महामारीमूळे उद्भवलेल्या  आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गरोदर मातांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल्स उस्मानाबाद  च्या वतीने सिझेरियन शस्त्रक्रिया प्रसुती व नॉर्मल प्रसुती स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. वसुधा दिग्गज दापके- देशमुख यांनी विनामूल्य ठेवली आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय उपळा (मा.) ता. जि. उस्मानाबाद या ठिकाणी आशाताई कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ, व महिला बचत गट  यांना वरील विषयी माहिती व मार्गदर्शन डॉ. दापके - देशमुख दिग्गज यांनी केले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय राबवत असलेल्या कारोना आरोग्य व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय उपळा  सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद च्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या आशाताईंना व इतर महिलांना 'कोरणा योद्धा' सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पडवळ यांनी केले तर आभार ग्रामसेवक आगळे ए.व्ही. यांनी मानले.सामाजिक आंतर राखत व सँनिटाजर चा वापर करत हा  छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री दत्तात्रय पडवळ, सदानंद जगदाळे,डॉ. प्रवीण शेटे राजाभाऊ माने, सुनील बाप्पा घोगरे, डॉ. हर्षद पडवळ, प्रताप पडवळ,  सह्याद्री ब्लड  बँकेचे शशिकांत करंजकर, राजानंद तवले, गजानन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 
Top