Views




सास्तुर येथील निवासी अपंग शाळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुनील साळुंके यांच्यावतीने कपाट भेट

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या यांच्यावतीने सुनील साळुंके यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळेच्या ग्रंथालयासाठी कपाट भेट दिले. लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तके ठेवण्यासाठी कपाट आवश्यक असल्याचे समजले. त्यामुळे ही भेट देण्यात आली. यावेळी कपाटाच्या चाव्या दिव्यांग विद्यार्थ्यांकडे सूपूर्द करण्यात आल्या. यावेळी गोविंदराव साळुंके, सुनील साळुंके, प्रकाश भगत, राजेंद्र कदम, निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, सचिन रणखांब, गोपाळ माने, तुळशीराम नादरगे, प्रा.बी.एम.बालवाड, शाळेतील दिव्यांग विद्यार्थी दत्ता गिरी, सोनाली बेळे, कर्मचारी निशांत सावंत, सुर्यकांत कोरे, ज्ञानोबा माने, माधव मुंडकर, उपस्थित होते.
 
Top