Views


मुद्रांक शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शासनाचे लाखो रुपये बुडाले....

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
 
           शासकीय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केल्यामुळे राज्यातील बहुतेक ठिकाणी दस्तांची नोंदणी होऊ शकली नाही. परिणामी शासनाचा लाखो रुपये महसूल बुडाला आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही येत्या 04 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा देखील यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे राज्यातील 500 हून अधिक रजिस्टर कार्यालय सुरू असूनही एकही दस्ताची नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे राज्य सरकारला दस्तनोंदणी यातून मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडाला जर आमच्या मागण्या आगामी काळात मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही 04 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करू असा इशारा आता संघटनेने दिलेला आहे. आंदोलकांनी सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे जीवन विमा सुरक्षाकवच मिळावे त्यांच्या विभागातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या तीन कर्मचार्‍यांना भरपाई मिळावी. तातडीने रखडलेल्या भरत्या कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात तुकडेबंदी आणि रेरा कायद्या नवे झालेल्या कारवाई त्वरित मागे घ्यावेत अशा मागण्या आहेत. याबाबत बोलताना राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत म्हणाले की नोंदणी आणि मुद्रांक विभागात राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना मागील 02-03 वर्षापासून विविध मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. कोरोनाच्या  काळात मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाने 15 टक्के उपस्थितीचे बंधन असताना शंभर टक्के उपस्थिती मध्ये काम करत आहेत.

 
Top