Views


दिव्यांगत्वावर मात करूण ऋतुजाने मिळवले 92 टक्के गुण 
 
लोहारा:-( इकबाल मुल्ला)
उस्मानाबाद येथिल श्री.श्री.रविशंकर विदयालयाची विदयार्थीनी ऋतुजा प्रकाश स्वामी हीने दहावीला 92 टक्के गुण घेवून उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.विशेष म्हणजे ऋतुजा ही कर्णबधीर असुन तिला एैकण्यास कमी येते.तरीही आपल्या दिव्यांगत्वावर मात करूण सर्वसामान्य विदयार्थ्याप्रमाणे तिने दहावीच्या परिक्षेत मोठे यश संपादन केले आहे.यासाठी तिला विदयालयातील शिक्षक वृदांचे सहकार्य लाभले आहे.92 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाल्याबददल ऋतुजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top