Views


तेरणा पब्लिक स्कुलचा निकाल 100  टक्के
सीबीएसई 10 वी बोर्ड परीक्षेत 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणारे ३० टक्के विद्यार्थी

लोहारा :-(इकबाल मुल्ला)

 मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएसई 1o वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उस्मानाबाद शहरातील तेरणा पब्लिक स्कुलचा निकाल शंभर टक्के लागला आहे.या शाळेच्या विद्यार्थ्यांनी  उत्तुंग यश मिळवण्याची परंपरा कायम राखली आहे.
बबन खोंदे याने 95 टक्के गुण घेउन शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. शिवम मस्के ( 94 टक्के, द्वितीय), स्वप्नजा जाधव व शुभम राजुरकर ( 93% तृतीय), रचना रोचकरी (92 %), प्रतिक थोरे (92%), शिवकुमार सागडे ( 92% ), ऋषिकेश बरडे (92 %), अमित लोमटे (92%), विश्वजीत गाढवे (91%), अश्लेषा देशमुख (91), वैष्णवी पाटील (91%), तुषार कदम (90%), शार्दूल माखरे (90%) ऋषिकेश जगदाळे(90%), अवधुत भोसले (96%), प्रियंका गवळी (90%), शाळेच्या 30 टक्के विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. शाळेने  स्थापनेपासूनच 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे . या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एल. एल. पाटील, सचिव अनंतराव उंबरे, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top