Views

कळंब तहसिल प्रशासनातर्फे कळंबकरांना महत्त्वाचे आवाहन

कळंब:-(प्रतिनिधी)
कळंब:- याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये पॉझीटिव्ह रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नावे देऊन प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित आहे. 
किंवा पॉझीटिव्ह रुग्णाच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या कोणी संपर्कात आले असेल तर नागरिकांनी स्वतः पुढे यावे , यासाठी कोणालाही घाबरण्याची गरज नाही. अशा व्यक्तींची फक्त टेस्ट घेतली जाईल. 
दुसऱ्याच दिवशी रिपोर्ट येतो. यात असे व्यक्ती निगेटिव्ह असतील तर चांगलेच आहे. जर कोणी पॉझीटिव्ह आले तर त्यांच्यावर लगेचच योग्य उपचार सुरू होतील.
 तसेच या गोष्टी वेळेवर झाल्या तर कोणाच्याही जीवितास धोका होणार नाही. तर बाधीत रुग्णाचे संपर्क शोधण्यासाठी प्रशासन संपूर्ण प्रयत्न करत आहे यात सहकार्याची अपेक्षा आहे. आपण बाधीत कुटुंबाच्या संपर्कात आला असाल तर स्वतःबद्दल तसेच परिसरातील इतर संशयित यांची माहिती प्रशासनास द्यावी. 
आपण सहकार्य करावे आपणास प्रशासनाकडून सहकार्यच मिळेल ,आपली काळजी घेतली जाईल.  शहरातील सर्वांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन कळंब च्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केले आहे...


 
Top