Views


साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा -- आ.सुजितसिंह ठाकूर

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य शासनाने शिफारस करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीत खूप मोठे योगदान राहिलेले असून त्यांनी साहित्यलेखन व शाहिरीच्या माध्यमातून केलेले समाज प्रबोधन कार्य अलौकिक आहे. तुकाराम ऊर्फ अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे यांच्या मराठी भाषेत 35 कादंबऱ्या, 15 लघु कथांचा संग्रह 12 पटकथा आणि पोवाडा व लावणी शैलीतील लोककथात्मक गाणी लिहिली आहेत. त्यांच्या फकिरा कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला असून त्यांचे बरेच साहित्य विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे. तर त्यांच्या लेखनावर आधारित 7 चित्रपट आहेत. तरी महाराष्ट्र शासनाने चालू वर्षी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले. थोर समाज सुधारक, साहित्यसम्राट, लोकशाहीर तुकाराम ऊर्फ अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
 
Top