राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत लोहारा तालुका भाजप यांच्यावतीने मास्क वाटप
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
राज्याच्या माजी ग्रामविकास तथा महिला व बालकल्याण मंत्री भाजपच्या नेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश बुद्धिजीवी प्रकोष्ठ राज्यसंयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथे भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यावतीने सामाजिक भावना जपत गरिब, वंचित कुटुंबाना, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, भाजी विक्रेते, हातगाडी चालवणारे छाेटे हाॅटेल चालक, बांधकाम मजुर, व्यापाऱ्यांना, अदिंना साेशल डिस्टन्स ठेऊन मास्क वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स.सदस्य वामन डावरे, भाजपा माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, अदि, उपस्थित होते.