लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष भरत सुतार यांच्यावतीने सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील पत्रकारांना मास्क व सॅनिटायझर वाटप
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही पत्रकारांना वृत्त संकलनासाठी घराबाहेर पडावे लागते. अत्यावश्यक सेवेत कोरोनासारख्या काळात पत्रकारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. समाजात कोरोना बद्दल जनजागृती घडविण्यात पत्रकारांचे मोठे योगदान लक्षात घेता लोहारा तालुका केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष भरत सुतार यांच्यावतीने सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील पत्रकारांना सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करून मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी गेल्या पाच महिन्यापासून कोरोना संदर्भात माहिती घेण्यासाठी पत्रकार दिवस रात्र एक करून घराबाहेर पडत आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पत्रकारांच्या आरोग्याची काळजी म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपत मास्क, सॅनिटायझर वाटप करीत असल्याचे भरत सुतार यांनी यावेळी सांगितले. यावेळी लोहारा शहरातील पत्रकार निळकंठ कांबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, अशोक दुबे, कालिदास गोरे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, गणेश खबोले, अब्बास शेख, सचिन ठेले, यशवंत भुसारे, जसवंतसिह बायस, मेहबूब फकीर, विकास होंडराव, गणेश हिप्परगेकर, मल्लिनाथ बिराजदार, आदि, उपस्थित होते.