Views


लोहारा येथील उपचारासाठी औरंगाबाद येथे गेलेल्या जेष्ठ नागरिकाला कोरोना पॉझिटिव्ह


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
लोहारा शहरातील  प्रभाग क्रं.14 मधील एक जेष्ठ नागरिक दि. 24 जुलै रोजी अपेक्स हॉस्पिटल औरंगाबाद येथे कोविड पॉजिटिव्ह आढळल्याने सदरील रुग्णाचे घर सील करण्यात आले असुन संपर्कात आलेल्या 10 जणांना swab घेण्यासाठी CCC लोहारा येथे दाखल करण्यात आले आहे. सदर रुग्ण हे मूळचे माकणी येथील रहिवाशी असून मागील दीड वर्षांपासून लोहारा शहरातील प्रभाग क्रं. 14 मधील त्यांच्या मुलाच्या घरी वास्तव्यास आहेत. 14 महिन्यांपूर्वी सदर रुग्णास पॅरॅलीसीस चा अटॅक आला होता. त्यामुळे  त्यांच्यावर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. ते नियमितपणे दिलेला औषोधोपचार  घेत होते. मात्र लॉकडाऊन काळात तपासणीसाठी गेले नव्हते, असे समजते. त्यानंतर दि.20 जुलै रोजी त्यांना पुन्हा तसाच अटॅक आला तेंव्हा त्यांनी सोलापूर येथील रुग्णालयास संपर्क साधला असता कोविड टेस्ट करून घ्या आणि negative रिपोर्ट आला तर या, असे सांगण्यात आले. म्हणून त्यांना लातूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्यांची antibody टेस्ट करण्यात आली ती दि.22 जुलै रोजी negative आली. त्यांना मेंदू संबंधित आजार असल्याने आपण संबंधित रुग्णालयात पुढील उपचारासाठी जावे असा सल्ला तेथील रुग्णालयात देण्यात आला. त्यामुळे त्यांना ताबडतोब  सोलापूर येथे हलवण्यात आले. त्याच दिवशी रात्री सोलापूर येथील दवाखान्यात (दि.22 जुलै) रोजी  X-ray केल्यानंतर संशय निर्माण झाला. त्यामुळे कोविड आणि मेंदूविकार तज्ञ या दोन्ही गोष्टी उपलब्ध असतील अश्या ठिकाणी रुग्णास घेऊन जावे, या विचाराने रुग्णाच्या सोबत असणाऱ्या नातलगांनी औरंगाबाद येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर औरंगाबाद येथे दि.23 जुलै रोजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना कोविड सेक्शन मध्ये ठेवून त्यांचा swab घेण्यात आला. दि.24 जुलै रोजी रात्री ICMR पोर्टल वर रिपोर्ट positive आल्याचे समजले. सदरील रुग्ण कोविड बाधित असल्याचे समजताच लोहारा शहरात दक्षता आणि सतर्कता दाखवत लोहारा तहसीलदार विजय अवधाने, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक आर.यु. सूर्यवंशी, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांच्या प्रयत्नाने शहरातील रुग्णांचे राहते घर आजूबाजूने पत्रे मारून शील करण्यात आले आहे. दि. 25 जुलै रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून तालुका आरोग्य अधिकारी सह आशा कार्यकर्ती व आरोग्य कर्मचारी तसेच नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे, अफजलोदिन शेख, बाळू सातपोते आदींनी रुग्णाच्या घरी नातेवाईकांना संपर्क साधून विलगिकरणासाठी वेळीच दक्षता घेत उपाय योजना केले आहे. रुग्णाच्या संपर्कातील 10 जणांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह लोहारा येथील कोरोना कोव्हीड सेंटर येथे 108 रुग्णवाहिकेद्वारे कोंरोटाईन करून तसेच swab घेणेसाठी पाठवण्यात आले आहे. तरी शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची दक्षता घेत घराबाहेर काम असेल तेव्हांच पडावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांनी केले आहे.

 
Top