Views


पोतराजाना सेनेच्या वतिने मास्क, गोळ्या चे वाटप

कळंब:- (प्रतिनिधी)
    पोटासाठी वणवण भटकणार्‍या भटक्या समाजातील लोकांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी मास्क सॅनिटायझर व अर्सनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले.
    शहराच्या बाहेर  पाल ठोकून जवळपास शंभर कुटुंब वास्तव्य करत आहेत. यात घरोघरी जाऊन विविध उपक्रमाचे दुरुस्ती,  पोतराज, लक्ष्मी आई वाले, फेरीवाले, यांचा समावेश आहे त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक ही असून समाज सोयी सवलती पासून लांब आहे. अशा भटक्यांना कोरोना संदर्भात जनजागृती करून त्यांना मास्क,आर्सेनिक अल्बम च्या गोळ्या, सॅनिटायझर व किराणा साहित्य देण्यात आले. यावेळी त्यांना गोळ्यांचा दुसरा डोस ही पालावर नेवून देण्यात येणार असल्याचे शिवाजी कापसे यांनी सांगितले.
 
Top