Views


कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची  नियुक्ती

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

 जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोविड-19 च्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने कोविड-19 च्या प्रादुर्भावात वाढ होऊ न देता वेळीच नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे राबविणे अतिशय आवश्यक आहे.
     त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे राबविण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीसाठी खालीलप्रमाणे तालुकानिहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
   उस्मानाबाद तालुक्यासाठी उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी  रामेश्वर रोडगे, तुळजापूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे , कळंब तालुक्यासाठी कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, वाशी तालुक्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशीला देशमुख, भूम तालुक्यासाठी भूमच्या उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर, परंडा तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी आंधळे, उमरगा व लोहारा तालुक्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांची संपर्क अधिकारी म्हणून नियक्ती केली आहे.
      सर्व नियुक्त संपर्क अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावे.
    कोविड-19 चे प्रतिबंधासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन व या कार्यालयाने वेळावेळी  दिलेल्या आदेशांनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यक कार्यवाही करावी.
     कोविड-19 चे प्रतिबंधासाठी वेळावेळी देण्यात आलेल्या आदेशांची पोलीस, आरोग्य व इतर यंत्रणांच्या मदतीने प्रभावीपणे अंमलबजावणी व त्याअनुषंगाने आवश्यक ती नियंत्रणात्मक कार्यवाही करावी.
प्रतिबंधित क्षेत्र (CONTAINMENT ZONE) मध्ये कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी व कडक अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी.
कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे (Contact Tracing) व त्यांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये (Institutional Quarantine), अलगीकरणामध्ये (Isolation) ठेवणे, संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये (Institutional Quarantine), अलगीकरणामध्ये (Isolation) ठेवणे इ. कार्यवाही प्रभावीपणे करण्यासाठी पोलीस, आरोग्य व इतर यंत्रणांमध्ये समन्वय साधणे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी वेळावेळी दिलेल्या आदेशांनुसार आवश्यक कार्यवाही करणे.
    या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.
 
Top