Views


 उस्मानाबाद जिल्ह्यात  ३ जुलै रोजी  सात रूग्ण कोरोना  पॉजिटीव्ह आढळले.


उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

शुक्रवार ( दि. 0३)रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 192 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 
 07 पॉसिटीव्ह, 05 अनिर्णित व  157 negative व 23 रिपोर्ट्स पेंडिंग असा आहे. असे आज एकूण 07 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे. 
उमरगा तालुका -02.
तुळजापूर तालुका -03
उस्मानाबाद -02.

उस्मानाबाद जिल्ह्यतील परंतु बाहेर जिल्ह्यात पॉसिटीव्ह येऊन तेथेच उपचार घेणाऱ्या तीन रुग्ण आज आपल्या जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. 

पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती पुढील प्रमाणे आहे. 
*तीन पेशंट तुळजापूर तालुक्यातील आहेत, त्यापैकी एक खडकी तांडा येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे. दोन पेशंट हे प्रॉपर तुळजापूर मधील असून एक पूर्वीच्या पॉजिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे व दुसरा उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील कर्मचारी आहे. 
*दोन पेशंट  उमरगा तालुक्यातील असून त्यापैकी एक बलसूर व एक तुरोरी येथील आहेत. 
* दोन पेशंट हे उस्मानाबाद तालुक्यातील असून, त्यापैकी एक MIDC उस्मानाबाद व एक कनगरा येथील आहे. 

एकूण रूग्ण:- 255.

बरे झालेले रूग्ण:-184

 एकूण मृत्यू:- 12.
 
एक्टीव्ह रूग्ण:-59.

 
Top