Views


उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात खुनाच्या गुन्ह्यात एकास जन्मठेपेची शिक्षा.....


कळंब:-(प्रतिनिधी)
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात खुनाच्या गुन्ह्यात एकास जन्मठेपेची शिक्षा
कळंब  पो.ठा. येरमाळा येथील गु.र.क्र. 150/2017 या भा.दं.सं. कलम- 302, 201, 120 (ब), 176, 34 नुसार दाखल गुन्ह्याची सुनावणी उस्मानाबाद सत्र न्यायालय- 1 येथे झाली. आज दि. 27.07.2020 रोजी मा. न्यायालयाने आरोपी- संजय दिलीपराव मडके, वय 28 वर्षे, रा. मोहा, ता. कळंब यास खुन केल्याबद्दल भा.दं.सं. कलम- 302 अन्वये जन्मठेप व 1,000/-रु दंड आणि खुनाचा पुरावा नष्ट केल्याबद्दल भा.दं.सं. कलम- 201 अन्वये 3 वर्षे सक्त मजुरी व 500/-रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरा आरोपी  सुदर्शन बिभीषण मडके, वय 25 वर्षे, रा. मोहा यास चांगल्या वर्तणुकीची हमी देणाऱ्या 15,000/-रु. च्या बंधपत्रावर मुक्त केले आहे.
 
Top