Views


मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजग्रहावर हल्ला करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी -- वंचित बहुजन आघाडी
 
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजग्रहावर हल्ला करणार्‍या  समाजकंटकांचा जाहीर निषेध करून, या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जि. का. सदस्य रविकिरण बनसोडे यांनी लोहारा तशिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृहावर संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली आहे. व घराचे काचा वर दगडफेक केली आहे. या घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. राजगृहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी हे घर बांधले आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटायला येतात, आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरू या प्रकरणात सामील असलेले आरोपी आणि त्यामागील असणाऱ्या प्रवृत्ती त्यांचा उद्देश जातीय दंगली घडविण्याचा व आंबेडकरी समाजाची अस्मिता दुखावून त्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त करून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा दिसून येत आहे, तरी तमाम आंबेडकरी जनतेच्या सदरील कृत्यामुळे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. यामुळे संबंधित समाजकंटक विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जि.का. सदस्य रविकिरण बनसोडे, साजिदा शेख, दत्ता गायकवाड, राहुल गायकवाड, सर्जेराव बनसोडे, मोहन गायकवाड, तय्यब मुल्ला, समीर खापरे, राहुल वाघमारे, अमोल तुंगे, यांच्या सह्या आहेत.

 
Top