Views


व्यक्ती हिता पेक्षा समाज हित महत्वाचे....ह.भ.प. बोधले

कळंब पत्रकार संघाचे वतीने अन्न दाता पुरस्काराचे वितरण


कळंब-(प्रतिनिधी) - 

व्यक्ती हितापेक्षा सामाजिक हित महत्त्वाचे आहे, यामुळेच कोरोना च्या या काळात पंढरपूर येथील वारी शासनाने रद्द करून भाविकांनी माणुसकी जपल्याचे दिसून येत आहे असे प्रतिपादन ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा अन्नदाता पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी केले. 
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा विठ्ठल रुक्मिणी २०२० अन्नदाता पुरस्कार यावर्षी कळंब येथील देवडा फाऊंडेशन व जीवराज प्रतिष्ठान यांना प्रकाश महाराज बोधले व परमेश्वर महाराज बोधले यांच्या हस्ते करसनदास पटेल व संजय देवडा यांना मंगळावर ता. ३० रोजी देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे.वर्षभर विविध सामाजिक कामात अग्रेसर राहून अन्नदाता करणाऱ्या व्यक्ती संस्थाना हा पुरस्कार देण्यात येतो, यावर्षी वर्षभर व कोरोना लोकडाऊन च्या काळात करसन पटेल , अभय देवडा, संजय देवडा यांच्या संस्थेने मोठ्या प्रमाणावर अन्नदान करून , कर्मचारी, सर्व सामान्यांना व गरजूंना घरपोच अन्नदान करून कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली होती. 
     देवडा परिवार यांच्या स्व. विजयकुमार देवडा फाऊंडेशन व करसन पटेल यांच्या जीवराज प्रतिष्ठान यांची या दोन्ही संस्थांची विठ्टल-रूक्मीणी २०२० अन्नदाता पुरस्कार साठी निवड करण्यात आली होती, विठ्ठल रुक्मिणी याच्या प्रतिमेचे छायाचित्र असलेले  पुरस्काराचे वितरण प्रसंगी विश्वस्त सतीश टोणगे, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सचीन पवार, संदीप बावीकर, माणिक बोंदर, हेमंत रामढवे, रतनसी  पटेल, गंगदास पटेल संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांच्यासह शहरातील पत्रकार संघाचे शिलेदार उपस्थित होते. 
 याप्रसंगी रोटरी च्या नुतन अध्यक्ष व सचीव यांचाही प्राथमिक स्वरूपात संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन रमेश अंबिरकर, प्रास्ताविक माधवसिंग राजपूत तर आभार परमेश्वर पालकर यांनी केले.याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी सर्वानुमते यावर्षी पासून कै. सतीश मडके पत्रकारिता पुरस्कार, कै. शकुंतला प्रभाकर देशपांडे यांच्या नावे महिला पत्रकारांना पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे.

 
Top