मोलमजुरी करून बजरंग पांडुरंग गिरी
मिळविले 73%गुण
कळंब :-(प्रतिनिधी)
कळंब तालुक्यातील जवळ खुर्द येथील, बजरंग पांडुरंग गिरी या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे, घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानादेखील त्याने हे यश मिळविले आहे, घरी लाईटची देखील व्यवस्था नाही, घरची परिस्थिती अत्यंत बिकट असुन आई वडील रोजंदारी करीत कुटुंबाची गुजरान करतात, गावातील छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सावंत सर, आई वडील, रुक्मिणी पांडुरंग गिरी, शाळेतील सहशिक्षक श्री डोळस सर, श्री लोहार सर, श्री तांबारे सर,श्री सावंत सर, श्री लोमटे सर, चुलते गणेश गिरी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
चौकट ::
बजरंग ला व्हायचेय जिल्हाधिकारी, बजरंग पुढे उच्च शिक्षण घेऊन जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न आहे, प्रचंड मेहनत घेऊन, आई वडीलांचे नाव उज्ज्वल करणार आहे.
बजरंग गिरी विद्यार्थी
जवळ खुर्द, ता: कळंब.