Views


प्रतिभा निकेतन सेमीचा प्रतिक पाटील यांचा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार                          

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून प्रतिक पाटील याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्याला ९९.६० टक्के गुण मिळाल्याबद्ल दि. ३० जुलै रोजी त्यांचा सत्कार माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, आप्पासाहेब हाळ्ळे आदिंनीही त्यांचे विशेष कौतुक करुन आभिनंदन केले. यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिक पाटील यांचा फेटा, शाल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत बालकुंदे, आप्पासाहेब हाळ्ळे, प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.करबसाप्पा ब्याळे, प्रा.शिवाजी राजोळे, प्रा.विठ्ठल चलपते, प्रा.उमाकांत महामुनी आदिंनी  पेढे भरवून त्याचे कौतुक केले.

 
Top