Views


दुबार पेरणीच्या संकटाला व बँकेच्या कर्जाला कंटाळुन कळंब तालूक्यातील भाटशिरपुरा येथील 37 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या 

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी) 

 कळंब  तालुक्यातील भाटशिरपुरा गावच्या तरुण शेतकऱ्यानी शनिवारी(दि.04) रोजी दुपारी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष गायकवाड (वय 37) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या शेतातील गोठ्यात आपले आयुष्य संपवलं जेमतेम पावणे दोन एकर शेती असलेल्या संतोष गायकवाड यांनी आपल्या शेतात सुरुवातीला पाऊस चांगला पडल्याने पेरणी केली होती मात्र उगवला नसल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली त्याच बरोबर त्यांच्यावर मंगरूळ येथील बँकेत 90 हजार रुपयांचे कर्ज होतं अशी सुद्धा माहिती मिळते.कर्जबाजारीपणा आणि दुबार पेरणीचे संकट यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं नातेवाईक सांगत असून तशी माहिती त्यांनी पोलिसांना लेखी कळवली आहे. चालू बाकी असल्याने त्यांची कर्जमाफी झाली नव्हती त्यामुळे नवीन करण्यासाठी बँकेच्या खेटा मारत होते. अशी सुद्धा माहिती कळती यांच्या पश्‍चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले आहेत तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने गावात हलहळ व्यक्त होत आहे.

 
Top