Views


उस्मानाबाद शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 13 जुलै चे 19 जुलै 2020 या कालावधीत संचार बंदी आदेश लागू

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 13 जुलै चे 19 जुलै 2020 या कालावधीत संचार बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत गुरुवार (दि.9) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी हे आदेश जारी केले आहेत
    संचारबंदी कालावधी उस्मानाबाद नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेचा एक भागम्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिका क्षेत्रातील खालील अस्थापना वगळण्यात आले आहे
संचारबंदी काळात हे सुरू राहणार
सर्व किराणा दुकान चालू राहतील
सर्व दवाखाने मेडिकल चश्मा दुकाने पशुवैद्यकीय सेवा चालू राहतील
अंडी मटण चिकन दूध व दुग्धजन्य पदार्थ ब्रेड फळ विक्री करणारे व संबंधित वाहतूक करणारे व इतर अत्यावश्यक सुविधा चालू राहतील
    मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांनी भाजीपाला विक्रेत्यांना गल्लोगल्ली फिरून भाजी विक्री करण्यास सूचित करा वयाचे आहे तसेच एका भाजीविक्रेत्या एक गल्ली देण्यात यावी सदर विक्रेता दुसऱ्या गल्लीमध्ये येणार नाही याची दक्षता घ्यावी
सर्व बांधकामे सुरू राहतील बांधकामावर सर्व मजुरांनी अथवा स्वच्छ रुमालाचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे जार वॉटर सप्लायर निपाणीजवळ द्वारे वाटप न करता ग्राहकाकडे उपलब्ध भांड्यामध्ये पाणी यावेळेस सामाजिक अंतर पालन करावे किंवा आजार वाटर सप्लायर्स यांनी संपूर्ण ग्राहकास द्यावे परत न नेता त्याच्यामध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी व सर्व जार वाटर सप्लायर्स कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्र आधारे परवानगी राहील
    घरगुती गॅस घरपोच सेवा देताना गॅस कंपनी चा गणवेश परिधान करावा व त्याची गणवेश असलेल्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे
फिरते दूध विक्रेते यांच्यामार्फत घरपोच दूध अथवा दूध पाकिटांची विक्री वितरण करता येईल परंतु एका ठिकाणी उभे राहून दूध विक्री करता येणार नाही करत दूध दूध पाकीट वाटपाच्या वेळी कोरणा विषाणू covid-19 अनुषंगाने सामाजिक पालन करावे तसेच घरकुल दूध विक्रीची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत राहील
सर्व बँकेचे कामकाज ओमिनी एटीएम सुरू राहील
      सर्व प्रकारचे मालवाहतूक व त्यानुषंगाने उस्मानाबाद नगरपालिका क्षेत्रात गोदामे चालविण्यास परवानगी देण्यात येत आहे त्या अनुषंगाने त्या स्थापन आणि हमालांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावीत वर्तमानपत्रे व माध्यमाविषयी सेवा चालू राहतील सर्व शासकीय कार्यालये व केंद्र शासनाने सर्व विभागाचे कार्यालय सुरू राहतील या कार्यालयाचे विभागाचे कर्मचारी कार्यालयीन व पत्राद्वारे नगरपालिका क्षेत्रात प्रवास करून शकतील
जिल्हा व सत्र न्यायालय उस्मानाबाद येथील न्यायालयीन कामकाजात परवानगी राहील कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहील सदर ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे.
सदरील आदेशाची खडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी कुठल्याही व्यक्तीकडून या देशातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्याचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आदेशात म्हटले आहे

 
Top