Views


कल्याण(काका)आखाडे यांना विधान परीषदेवर संधी द्यावी:-अशोक माळी

उस्मानाबाद :- ता. प्र ( आसिफ मुलाणी)

भारतीय जनता पार्टीने माळी समज्याला गेल्या अनेक वर्षांपासून झुलवत ठेऊन अन्याय केला  तसेच माळी समाज्यासह ओबीसी समाज बरोबर घेऊन सत्ता मिळवली.व सत्ता आल्यानंतर माळी समाज्यासह ओबीसी समाज्याला नेहमी राजकारणात डावलण्यात आलं,म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण(काका)आखाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला, व राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवाराला माळी समाज्याने मतदान करावे असे आवाहन केले,व माळी समाज्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवाराला मतदान केले व  मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले.व आपली वेगळी ताकद कल्याण काका आखाडे यांनी दाखवून दिली.सावता परिषदेच्या माध्यमातून संबंध राज्यभर आपली एक वेगळी ओळख निर्माण करून आपल्या कामाच्या व जिद्दीच्या जोरावर राज्यातील माळी समज्याला एकत्रीत आणण्यासाठी जीवाचे रान केले.माळी समाज्याच्या अनेक प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले,माळी समाज्याचे दैवत असणारे संत सावता महाराजांच्या आरणला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देऊन विकासासाठी निधी मिळवून दिला.म्हणून सावता परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक कल्याण(काका)आखाडे यांना येणाऱ्या विधापरिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी संधी द्यावी,अशी मागणी बार्शी तालुक्यातील माळी समाज्याच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती बार्शी तालुका सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी यानी दिली.
 
Top