उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे परांडा येथील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, जिल्ह्यातील बळींची संख्या 8 वर
उस्मानाबाद (सैफोदीन काझी)
उस्मानाबाद जिल्हयातील परांडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना मूळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यांना उपचारासाठी सोलापूर च्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री 2.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला
परांडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले 54 वर्षीय पोलीस कर्मचारी यांना 13 जून रोजी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. लिव्हर आणि किडनीच्या त्रासाने ते त्रस्त होते.ते सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटल मधून 6 जूनला उपचार घेऊन परतले होते. यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे जिल्हाशल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले. पहिलेच लिव्हर आणि किडनीच्या त्रासाने त्रस्त असल्याने त्यांना सोलापूर येथे रूग्णालयात करण्यात आले असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना बाधितांची संख्या 183 झाली आहे तर 136 बरे झाले आहेत. व 39 जण अजून उपचार घेत आहेत.