Views


दोन वेळेस तपासणीला पाठवलेले थ्रोट स्वब अहवाल अनिर्णयीत आलेल्या एका तरुणाचा जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार घेत असताना मृत्यूबीड( प्रतिनिधी)  

दोन वेळेस तपासणीला पाठवलेले थ्रोट स्वब अहवाल अनिर्णयीत आलेल्या एका तरुणाचा जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार घेत असताना आज सोमवारी ( दि .8 ) सकाळी पाहाटेच्या सुमारास मृत्यू झाला .  दरम्यान संबंधित तरुणाचा स्वब आज सकाळी तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्याचा रिपोर्ट आज सायंकाळी प्राप्त होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . अशोक थोरात यांनी सांगीतले .
       मृत्यू झालेला 32 वर्षीय तरुण व त्याचे कुटूंब 31 मे रोजी मुंबईहून मातकुळी ( ता.आष्टी ) येथे परतला होता. एका बाधित रुग्णासोबत या कुटूंबाचा संपर्क आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दाम्पत्यांसह त्यांच्या दोन मुलांचे जिल्हा रुग्णालयात स्वब तपासणीसाठी घेतले होते . यात तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते . तर या तरुणाचा रिपोर्ट अनिर्णयीत राहिला होता . नंतर पुन्हा 48 तासांनी त्या व्यक्तीचा स्वब घेतला परंतू तो रिपोर्टही अनिर्णीत आला होता . अखेर रविवारी रात्री त्या व्यक्तीचा स्वब घेतला . परंतू , आज सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला .

 
Top