Views


*लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रेशीम शेती करावी -- तालुका कृषी अधिकारी देवकते*

लोहारा/प्रतिनिधी 


तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रेशीम शेती करावी, यासाठी महारेशिम अभियान जास्तीत जास्त प्रमाणात राबविण्यात यावा, असे तालुका कृषी अधिकारी महेश देवकते यांनी सांगीतले. महारेशिम अभियान जास्तीत जास्त प्रमाणात राबविण्या यावा यासाठी रेशीम विभागातील कांही कामे कृषी कार्यालय यांच्काडे वर्ग करण्यात आली आहेत. तरी हे कामे व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी पं.स.लोहारा सभागृहात तालुका कृषी अधिकारी देवकते यांच्या अध्क्षतेखाली महारेशिम अभियान अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी मार्गदर्शन करताना म्हणाले कि, जसे तुती लागवड करण्यासाठी पहिल्यांदा जमिनीची योग्य ती मशागत करावी लागते 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत पसरून घ्यावे जून ते सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर तुती रोपद्वरे लागवड करावी. किवा स्वतः कांड्याद्वारे नर्सरी करून रोप तयार करता येते. आपल्या भागात जास्त प्रमाणात वापरण्यात येणारी रोपाची जात महणजे V1 या जातीचे वेशिष्ट्य म्हणजे ह्या जातीचा रोपाची पान हा दुसऱ्या जातीच्या तुलनेत मोठा असतो, फांदी हि उभी असते म्हणजे कापण्यासाठी सोपी पडते, रोपतील अंतर हा 4 X 2 व 5+3 X 2 अंतर मध्ये करता येते. कीटक संगोपन करिता शेड हे 50 फूट X 22 फूट इतका असतो शेडच्या वरच्या बाजूस लोखंडी किंवा, सिमेंट पत्रे वापरली जातात. शेडच्या चारही बाजूने 2.5 फूट ते 3 फूट उंचीची भिंत बांधणे आवश्यक आहे. आतल्या बाजूने कोबा किंवा फरशी करणे आवश्यक आहे. कीटक संगोपन करिता लागणारे अंडीपुंज हे चॉकी सेंटर वरून आणले जाते. एका अंडीपुजा मध्ये 300 ते 400 कीटक बाहेर निघतात व 100 अनडीपुजा मधून 35000 ते 36000 कीटक बाहेर निघतात व हे कीटक पासून कोष्मध्ये रूपांतर होण्यासाठी 22 दिवस लागतात व 28 दिवसात उतपन्न बाहेर काढू शकतो. 100 अंडीपुजमधे 100 ते 120 किलो उत्पन्न काढता येते सदरील निघालेला कोश हा बीड, जालना, बारामती सोलापूर येथे आपले निघालेले कोश विकले जातात. सदरील रेशीम शेती साठी शासन 418815 /- इतके अनुदान रेशीम शेती साठी शासनाने मंजूर केलेले आहे. लागवडी साठी मजुरी व कुशल पहील्या वर्षी - 113754/- दुसऱ्या वर्षी - 60400 /- तिसऱ्या वर्षी - 60400/- कीटक संगोपन मजुरी व कुशल . - 184261/- अशी एकुण अंदाजपत्रक रक्कम - 418815/- (प्रत्येकी एकर साठी) एवढी आहे, असे यावेळी सांगीतले. या कार्यशाळेस जिल्हा रेशीम कार्यालयातील वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक जे. के.पाटील, शिवाजी तराळकर मंडळ कृषी अधिकारी लोहारा, सर्व कृषी सहाय्यक, सर्व मनरेगा विभागातील कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक ए.जे. सौदागर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डी.डी.चव्हाण, डाटा एंट्री ऑपरेटर वजीर मानियार, यांच्यासह ग्रामस्थ लाभार्थी, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top