Views


कळंब येथील शिवाजी नगर मध्ये  आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे शिवसेनेचे वतीने वाटप

कळंब (प्रतिनिधी)

उस्मानाबाद जिल्ह्याचे खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर व कळंब उस्मानाबाद चे  आ. कैलास घाडगे पाटील यांच्या आदेशानुसार   शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी  कापसे व शहर प्रमुख प्रदीप मेटे यांनी आज सोमवार(०८) रोजी शिवाजी नगर कळंब येथे भेट देऊन पाहणी केली यावेळी शिवसेना पक्षामार्फत गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आयुष्य मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या वाटपासाठी सुपूर्द करण्यात आल्या. या गोळ्याचा वापर करण्याचा तसेच येणाऱ्या काळात सजग राहून मुंबई पुणे व अन्य राज्यातून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनास कळवावी व कोरोना बाधित रुग्ण प्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आणण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी येणाऱ्या काळात सतर्क राहावे. तसेच नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी केले आहे.
      यावेळी उपस्थित  उपशहर प्रसुख मंदार  मुळीक , पत्रकार सुधाकर सावळे, दत्तात्रेय दळवे, प्रशांत गुठे, सतिश गंभीरे, आदी उपस्थित होते.

 
Top