Views


उस्मानाबाद जिल्हा मध्ये पाचवा कोरोणा बळी

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

    कोरोणा मुळे उस्मानाबाद जिल्ह्यात काल शनिवार (दि.१३) रोजी कोरोणा बाधित  तरूणाचा मृत्यू झाला होता.या घटनेला २४ तास होत नाही तोपर्यंत आज रविवार (दि.१४) रोजी कोरोणाना चा ५ बळी गेला. 
      उस्मानाबाद शहरातील काका नगर येथील उस्मानपुरा भागातील कोरोणा बाधित ५० वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. करोणामुळे जिल्ह्यात मृतांची  संख्या ५ झाली आहे.यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत कोरोणा बाधित रूग्ण हा नळदुर्ग येथील कोरोणा पाॅझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेला होता.मृत रूग्णाला मधुमेह, ह्रदयविकाराचा त्रास असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी माहिती दिली .
 जिल्ह्यात आतापर्यंत कोरोणामुळे ५ जणांचे बळी गेले आहे.
 उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स* 
कोरोनाग्रस्त:- 145
उपचार घेत असलेले :- 35
कोरोनमुक्त झालेले :-105
मृत्यू :- 05
एकूण जिल्हा 145


 
Top