Views


उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 3 नवीन रुग्ण आढळले

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

उस्मानाबाद जिल्ह्यात आज शनिवार
( दि.१३) रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात ३ नवीन रुग्ण आढळले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील  एकूण ७३ स्वॅब नमुने  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे
तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहे.त्या पैकी ३ रूग्ण पाॅझिटिव्ह, ७० जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट आले आहे.
      कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दि.१३/०६/२०२० रोजी पाठवलेल्या स्वेब रिपोर्ट्स शनिवार (दि.१३)ला  रिपोर्ट्स प्राप्त झाले असून  ३ रुग्णांचे  रिपोर्ट्स  पॉजिटीव्ह  आलेले आहेत.
या मध्ये एक ६५ वर्षीय महिला  रा. लक्ष्मी नगर  भूम. याचा समावेश आहे तर  दोन पेशंट परांडा येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत. असे आज तीन नवीन रुग्णात वाढ झालेली आहे. यामध्ये उस्मानाबाद शहरातील एका २५ वर्षीय कोरोणा बाधित तरूणाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोणामुळे मृत्यू झाल्याची संख्या ४ झाली आहे.

*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स*
कोरोनाग्रस्त:- 145
उपचार घेत असलेले :- 36
कोरोनमुक्त झालेले :-105
मृत्यू :- 04
एकूण जिल्हा 145

 
Top