Views


लोहारा येथील माजी विद्यार्थ्यांचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजार रूपयाचा धनादेश दिला 

   लोहारा :- (प्रतिनीधी)

           लोहारा येथील हायस्कूल लोहारा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने एकत्र येऊन स्थापना केलेल्या विद्या विकास प्रतिष्ठानाच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजार रूपयाचा धनादेश लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आले. लोहारा येथील हायस्कूल लोहारा या शाळेचे ठिक- ठिकाणी उद्योग, व्यवसाय तसेच विविध पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थानी महाराष्ट्र राज्याचे निवृत्त मुख्य अभियंता गुंडप्पा लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत विद्या विकास प्रतिष्ठान या बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. 
      लोहारा तालुक्यातील गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरज भागविण्याचा येणार आहे. परंतु यावर्षी करोनाच्या साथीमुळे संस्थेला कोणताही जाहीर कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यासाठी निश्चित केलेला निधी विद्या विकास प्रतिष्ठानाच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक्कावन हजार रूपयाचा धनादेश लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डाॅ अनंतराव गव्हाणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी संस्थेचे  सचिव तुकाराम गोरे, कोषाध्यक्ष नागनाथ केसकर, उपाध्यक्षा सौ. सुलन देवकर-खांडेकर, संचालक भारत काळे, चंद्रकांत विभुते, वसंत ठेले आदींची उपस्थित होते. शासनापुढेही आर्थिक अडचण निर्माण झाल्या आहेत. यासाठी प्रतिष्ठानाच्या संचालकाकडून सारासार विचार होत जमा झालेली ५१ हजार रुपये आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत आहोत.

 
Top