Views

तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात कोरोनाचा उपचार घेत असलेल्या सर्वच्या सर्व नऊ रुग्ण बरे होवुन घरी परतले आहेत.


तुळजापूर :-(प्रतिनिधी) -  

येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात कोरोनाचा उपचार घेत असलेले सर्वच्या सर्व नऊ रुग्ण बरे होवुन घरी परतले आहेत.
येथील उपजिल्हा रुग्णालयतील कोरोना विभागात नऊ कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत होते त्यापैकी पुणे रिर्टन ऐकवीस वर्षीय गर्भवती महिला प्रथम  कोरोना मुक्त होवुन घरी परतली त्यानंतर आज लोहारा तालुक्यतील पाच कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण बरे झाले तर आज नवी मुंबई रिर्टन कार्ला येथील रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने शुक्रवार दि.5 रोजी
त्यांना डिसचार्ज देण्यात आला. या कोरोना मुक्त रुग्णांना पुढील सात दिवस घरीच क्वारटांईन राहण्याचा सुचना दिल्या आहेत
या कोरोना बाधीत रुग्णांना निरोप देताना उपजिल्हारुग्णालय च्या वैद्यकीय अधिकारी डाँ चंचला बोडके कोरोना रुग्णालयाचे प्रमुख डाँ प्रविण रोचकरी  डाँ. जाधव,  झाडे सिस्टर भोसले,  सिस्टर शितल  सह कर्मचारी उपस्थित होते.


 
Top